Mumbai Rain Update: मुंबईत आज सकाळपासून पावसाची दमदार हजेरी; पूर्व, पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस
Rainfall in Mumbai City File Photo| (Photo Credit: ANI)

मुंबईत (Mumbai) आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईतील सायन (Sion), परेल (Parel), चेंबूर (Chembur), भांडूपसह (Bhandup) पश्चिम उपनगरातील अंधेरी (Andheri), सांताक्रूझ (Santacruz), जोगेश्वरी (Jogeshwari), वांद्रे (Bandra), माहीम (Mahim) परिसरात रात्रीपासूनच सुरुवात झाली होती. आज सकाळी उपनगरांसह मुंबईतील अन्य भागात देखील पावसाने जोर धरला. मुंबईतील परेल, सायन, चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. मुंबई उपनगरांतील काही भागांत तर विजांचा कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोरोना व्हायरस मुळे ठेवण्यात आलेल्या लॉकडाऊन मुंबईकर घरीच असल्यामुळे आज या पावसाचा मुंबईकरांना सामना करावा लागला नाही.

मुंबईत उपनगरांत रात्रीपासूनच पाऊस सुरु झाला होता. मात्र आज सकाळपासून मुंबईच्या ब-याच भागात दमदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे किंग्ज सर्कल, घाटकोपर, कुर्ला परिसराच ब-याच ठिकाणी पाणी साचेल. मुंबईतील भांडूप, अंधेरी, जोगेश्वरीसह ब-याच भागात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. मुंबईत आगमन झालेल्या पावसाने आज पहिल्याच दिवशी अनेक सखल भागांत तसेच रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे मुंबई महानगरपालिकेची कामे कितपत झाली आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालय. Rain In Mumbai: मुंबईतील बहुतांश ठिकाणी आज पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा, जाणून घ्या 7 जून पर्यंतसाठी हवामान खात्याचा अंदाज

3 जूनला महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला जबरदस्त फटका बसला. हे वादळ मुंबईत धडकणार असे संकेत मिळत असतानाही अचानक वादळाने दिशा बदलली आणि मुंबईवरील चक्रीवादळाचे संकट टाळले. मात्र 3 आणि 4 जूनला मुंबईतील अनेक परिसरात सोसाट्याचे वारे वाहत होते. आज मात्र जोरदार वा-यांसह पावसानेही जोर धरला होता. सद्य स्थितीत मुंबईतील काही भागात पावसाचा जोर ओसरला अजून अधून-मधून पाऊस पडत आहे. आज दिवसभर तरी पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.