मध्यप्रदेश राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लगतच्या संजय सरोवर (Sanjay Lake) धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) वैनगंगा नदीचा (Wainganga River) जलसाठ्यात वाढ होऊन जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
याशिवाय गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्रीपासून संजय सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार होता. या दृष्टिकोनातून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळपासूनचं शहरातील विविध ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे. (हेही वाचा - गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर 'स्तुत्य उपक्रम' का राबत नाही? आशिष शेलार यांचा सवाल)
मध्यप्रदेश राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लगतचा संजय सरोवर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीचा जलसाठ्यात वाढ होऊन जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे.@InfoBhandara pic.twitter.com/4Zudq33Wjw
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 30, 2020
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. तसेच आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागले आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील गावांना पुराचा वेढा बसला आहे.