Cloudburst Flooding in Ganderbal (PC - ANI)

Cloudburst Flooding in Ganderbal: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) च्या गांदरबल जिल्ह्यात (Ganderbal District) रविवारी मध्यरात्री ढगफुटी (Cloudburst) मुळे रहिवासी भागात पाणी शिरल्याने अचानक पूर (Flood) आला. गांदरबलच्या चेरवान कंगन भागात ढगफुटीमुळे भातशेती आणि घरांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेरवान कंगन भागात ढगफुटीमुळे श्रीनगर-कारगिल महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. लोकांना या मार्गावरून प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा रस्ता खुला होईपर्यंत प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. गांदरबलचे एडीसी गुलजार अहमद यांनी सांगितले की, ढगफुटीची घटना रात्री उशिरा घडली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल साचला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्ता मोकळा करणे हे आमचे प्राधान्य आहे. ज्यांची घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत त्यांना आम्ही वाचवले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. जिल्हा पोलीस, प्रशासन आणि खाजगी आस्थापना एकत्रितपणे काम करत आहेत. (हेही वाचा -Himachal Pradesh Clousburst: हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफूटी झाल्याने 9 जणांचा मृत्यू, 45 लोक बेपत्ता, बचावकार्य सुरु)

श्रीनगर-लेह महामार्ग बंद -

वाहतूक नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गांदरबल जिल्ह्यातील कचेरवान येथे रस्ता खराब झाल्याने श्रीनगर-लेह मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आला आहे. महामार्ग बंद केल्याने काश्मीर खोरे लडाख केंद्रशासित प्रदेशापासून तुटले आहे तर अमरनाथ यात्रेसाठी बालटाल बेस कॅम्पवही परिणाम झाला आहे. अधिकारी गरजूंना मदत करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. (हेही वाचा -Etawah Road Accident: इटावामध्ये आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; डबल डेकर बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू)

पहा व्हिडिओ - 

हिमाचल प्रदेशात ढगफुटी -

दरम्यान, ढगफुटीमुळे उध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती राज्यात बचाव कार्य चौथ्या दिवशीही सुरू आहे. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 45 जण बेपत्ता आहेत. एकूण 45 बेपत्ता पैकी 30 रामपूर उपविभागातील समेज जिल्ह्यातील आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 79 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.