Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

विदर्भ-मराठवाड्यात ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मराठवाड्यात पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचं सावट आहे. त्यात आज अचनाक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर ढग दाटून आले असून पुढचे तीन तास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.  (हेही वाचा -  Maharashtra Weather Forecast: वातावरणाचे खेंदाट! अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उन्हाचा तडाका; माहाराष्ट्रातील हवामान अंदाज, घ्या जाणून)

महाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. येत्या 3 तासात पश्चिम महाराष्ट्र, कोकणात वादळीवाऱ्यासह अवकाळी  होणार असल्याचा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान ४३ अंशांपर्यंच पोहोचलं आहे. उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, असा सल्ला देण्यात आलाय. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने  धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.