Nitesh Rane (फोटो सौजन्य - Facebook)

Nitesh Rane On Pahalgam Attack: भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahalgam Attack) वादग्रस्त विधान केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तहसीलमध्ये आयोजित हिंदू धार्मिक मेळाव्यात नितेश राणे म्हणाले, 'मुस्लिमांकडून वस्तू खरेदी करू नका. जर त्यांनी धर्म विचारल्यानंतर आपल्याला गोळ्या घातल्या, तर तुम्हीही त्यांचा धर्म विचारूनच वस्तू खरेदी करा. जर ती व्यक्ती म्हणाली की, मी हिंदू आहे तर त्याला हनुमान चालीसा वाचायला सांगा. कारण तो खोटेही बोलू शकतो. तुम्ही फक्त हिंदू दुकानांमधूनच वस्तू खरेदी करा. जर हे लोक (औरंगजेब) त्यांच्या कुटुंबाच्या जवळचे नसतील तर ते आपले काय करतील, हे लोक त्यांच्या धर्माबद्दल इतके कट्टर आहेत मग आपण त्यांना श्रीमंत का बनवावे?', असा सवालही यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित केला.

धर्माबद्दल विचारून वस्तू खरेदी करा - नितेश राणे

नितेश राणे यांनी पुढे म्हटलं की, जर ते धर्माबद्दल विचारून गोळ्या झाडत असतील, तर किमान धर्माबद्दल विचारून वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. ही मागणी हिंदू समाजाने केली पाहिजे. दुकानात गेल्यानंतर, तुम्ही त्याला त्याचा धर्म काय आहे हे विचार, तो खोटेही बोलू शकतो कारण तो नालायक आहे. म्हणून, कोणतीही खरेदी करण्यापूर्वी, कृपया धर्माबद्दल विचारा. जर तो स्वतःला हिंदू म्हणवून घेत असेल आणि त्याला हनुमान चालीसा वाचायला सांगा. जर त्याला ती वाचता आली नाही तर त्याला सांगा की, मी तुझ्याकडून वस्तू खरेदी करणार नाही. हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे, असं आवाहनही नितेश राणे यांनी यावेळी केलं. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: 'जर पंतप्रधान मोदींनी मला बंदूक दिली, तर मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारण्यास तयार आहे'- Abhijit Bichukale (Video))

ज्यांना आपण दूध पाजतो ते आपल्याला चावतील -

जर ते त्यांच्या धर्माबद्दल इतके कट्टर आहेत तर आपण त्यांना श्रीमंत का बनवत आहोत? जर ते धर्मासाठी जिहाद करत असतील तर आपण त्यांच्याशी बंधुत्वाबद्दल का बोलतो? तुम्ही या धार्मिक मेळाव्यातून शपथ घ्यावी की आतापासून आम्ही फक्त हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करू, मग ते कसे थरथर कापू लागतील ते पहा, असंही नितेश राणे यांनी म्हटलं.  (हेही वाचा, Devendra Fadnavis on Pakistani Nationals: पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही; मुख्यमंत्र्यांनी सुरू केली पाकिस्तानींना हाकलून लावण्याची तयारी)

आपण त्यांना दूध पाजतो. परंतु, नंतर तेचं आपल्याला चावतील. औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारले, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले, स्वतःच्या भावाला आणि वडिलांना मारले. जे लोक स्वतःच्या लोकांसोबत उभे राहिले नाहीत, ते तुमच्यासोबत कसे उभे राहतील? असा सवालही यावेळी नितेश राणे यांनी केला.