राधाकृष्ण विखे-पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट गहिर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडमोडी घडत आहेत. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या वकव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. “महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे हा यातला फरक आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीविरुद्ध टीकेची झोड उठवली जात आहे. यातच भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. “काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. सरकारमध्ये असूनही निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी”, असा टोला भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

राज्याला सद्यस्थितीला शिवसेना, राष्ट्रवादी इतकाच काँग्रेस पक्षही जबाबदार आहे. राहुल गांधींनी हे वक्तव्य करून अत्यंत दुटप्पी भूमिका घेतली आहे. काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. सत्तेत राहून फायदा तेवढा कमवण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. कोरोनामुळे लोक संकटात असताना राज्यातले मंत्री मात्र गायब आहेत, असे म्हणत विखेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना हे सरकार फक्त फेसबुकवरच चालणार का ?असा सवाल विखे-पाटलांनी उपस्थित केला होता. हे देखील वाचा- अमरावती जिल्ह्यात टोळधाड दाखल; फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

दरम्यान, राष्ट्रवादी आणिा काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे आणि हे सरकार पाच वर्षाचा कालावधी नक्की पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला होता. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मनातली खदखद बाहेर पडताना दिसत आहे. सरकारला भक्कम पाठिंब्याची गरज असताना काँग्रसेचा सूर काही वेगळाच आहे. याआधीही काँग्रस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी मुख्यमंत्र्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.