UGC Final Year Examinations: अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होऊ शकत नाहीत. मात्र, राज्य सरकार युजीसी (UGC) सोबत चर्चा करून परीक्षांच्या तारखा पुढे ढकलू शकते, असा निर्णयपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिला होता. यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी न्यायालयाच्या निर्णय मान्य असल्याचं म्हटलं होतं. मात्र, शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या. यात देशात 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज राहणार बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
यावरून उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद...यूजीसी म्हणते 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या...राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय? 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील, तर परीक्षा घ्यायच्या कशा? (हेही वाचा - UGC Final Year Examination: विद्यापीठांच्या पदवी परीक्षा 2020 घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्र कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले युवा अध्यक्ष सत्यजित तांबे)
केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद ..यूजीसी म्हणतy 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा. pic.twitter.com/ZcePitfl6T
— Uday Samant (@samant_uday) August 30, 2020
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात दिलेल्या निर्णयावर उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. मात्र, आता 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील, तर परीक्षा घ्यायच्या कशा? असा सवाल सामंत यांनी केला आहे.