उदयनराजे भोसले आणि श्वेता वाघ (Photo Credits-Twitter)

Hyderabad Rape and  Murder Case: आरोपींच्या एन्काउंटर बाबत उदयनराजे भोसले आणि चित्रा वाघ यांच्याकडून पोलिसांच्या कारवाईचे समर्थन हैदराबाद येथे एका महिला पशु चिकित्सक डॉक्टरवर 27 नोव्हेंबरला चार नराधमांनी अत्यंत क्रूरपणे तिच्यावर बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळत आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आज सकाळी या प्रकरणातील सर्व आरोपींना घटनास्थळी घेऊन जात त्यांचा एन्काउंटर करण्यात आला आहे. यामध्ये या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर आरोपींना ठार करण्याच्या हैदराबाद पोलिसांच्या निर्णयाचं भाजपचे उदयन राजे भोसले, चित्रा वाघ यांच्याकडून समर्थन करण्यात आले आहेत.

हैदराबाद मध्ये महिलेवर झालेला निर्दयी बलात्कार आणि जिवंत जाळल्याच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र अखेर आरोपींना ठार करण्यात आले आहे. याचे समर्थन उदयनराजे यांनी करत असे म्हटले आहे की, हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या 4 आरोपी पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले, तेलंगणा पोलिस दलाचे मन:पूर्वक अभिनंदन! (हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करणारे पोलिस सिंघम वी.सी. सज्जनार कोण आहेत; जाणून घ्या)

Udayanraje Bhosale Tweet:

उदयनराजे भोसले ट्वीट (Photo Credits-Twitter)

तसेच चित्रा वाघ यांनी सुद्धा ट्वीटरवर ट्वीट करत आपली प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, समाजमनाची हीचं मागणी होती तेच झालं,दिल्लीची,कोपर्डीची निर्भया,नयना पुजारी व अशा किती निष्पाप जिवांचा बळी घेतला आज ही त्यांच्या आईवडीलांच्या डोळ्यातले पाणी खळत नाही तेव्हाही नराधमांना असेचं ठोकले असते तर पुनरावृत्ती टळली असती.एक आई म्हणून हैदराबाद कारवाईचे समर्थनचं.

Chitra Kishor Wagh Tweet: 

काय आहे नेमके प्रकरण?

पशु चिकित्सक पीडित महिला डॉक्टर बुधवारी कोल्लरु येथील पशु चिकित्सालयात गेली होती. तेथेच नजीक असलेल्या शादनगर टोल नाक्यावर तिची स्कुटी पार्क केली. रात्री जेव्हा महिला तेथे आली त्यावेळी स्कुटी पंक्चर झाली होती. यावर तिने प्रथम बहिणीला फोन लावला आणि याची माहिती दिली. या बोलण्याच्या दरम्यान तिने बहिणीला मला भीती वाटत असल्याचे ही म्हटले. यावर बहिणीने तिला टॅक्सीने घरी येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने काही लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी तिचा टोल प्लाझा येथे शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेचा जळालेला मृतदेह भुयारी मार्गाचा येथे आढळून आला.