Navneet Rana, Ravi Rana यांच्या 'मातोश्री' बाहेरील हनुमान चालिसा पठणाच्या हट्टावर गृहमंत्री Dilip Walse Patil यांची प्रतिक्रिया; राणा दाम्प्त्याला दिला सल्ला!
Dilip Walse Patil | Twitter/ANI

नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या खाजगी निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याच्या अट्टाहासामुळे सध्या शिवसैनिक आणि राणा दांम्प्त्यांमध्ये संघर्षाचं वातावरण बघायला मिळत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा राज्य सरकारची प्रतिमा मलिन करत आहेत, वातावरण बिघडवत असल्याचं वळसे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान काल मुंबई पोलिसांनी राणा दांम्प्त्य खार या त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर एक प्रतिबंधात्मक नोटीस देत त्यांना मातोश्री वर न जाण्याच्या सूचना देत आहेत. मात्र राणा दांम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं वारंवार सांगत आहेत. सोबतच आज त्यांनी शिवसैनिक आपल्या इमारतीमध्ये कसे घुसू शकतात? खासदार, आमदारांना बाहेर पडू दिलं जात नाही मग शिवसैनिकांना का रोखलं जात नाही? असा सवाल देखील विचारला आहे. नक्की वाचा:  Ravi Rana, Navneet Rana मातोश्री वर हनुमान चालिसा पठणावर ठाम; शिवसैनिक गुंडागर्दी करत असल्याचा रवी राणा यांचा आरोप .

गृहमंत्र्यांनी सध्या मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता दोन्ही बाजूंनी शांतता ठेवावी असं आवाहन केले आहे. तसेच राणांनी मातोश्रीवर हनुमान पठणाऐवजी त्यांच्या घरीच त्याचे पठण करावं. असा सल्ला दिला आहे. मातोश्रीवरील हनुमान चालिसा पठणाचा हट्ट हा कोणाच्या तरी सांगण्यावरून ते हे करत आहेत असल्याचा दिलीप वळसे पाटीलांनी केला आहे.