Extramarital Affair | (Photo Credits: File Photo)

विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) ठेवणाऱ्या पतीचे एका पत्नीने असे काही बिंग फोडले आहे की ज्याची त्याने कल्पनाच केली नसेल. अनेकदा तर लोक आपल्या प्रिय व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी एकतर खासगी गुप्तहेर ठेवततात. नाहितर दुसरा काहीतरी मार्ग शोधतात. पण, गुजरात येथील आरिफ मांजरा नामक एका व्यवसायिकाच्या हायटेक पत्नीने भलतीय शक्लल लढवली. तिने चक्क पतीच्या कारला जीपएस ट्रॅकर (GPS Tracker) लावला. पतीला रंगेहात पकडले. पुणे (Pune) शहरातील हिंजवडी येथे या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर.

आरिफ मांजरा हे गुजरातमधील एक व्यवसायिक आहेत. त्यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. तिला भेटण्यासाठी अनेकदा ते पत्नीला खोटे बोलायचे. कधी व्यवसायाचे निमित्त कधी कामाचे निमित्त काढून ते वारंवार बाहेर जायचे. अनेकदा दीर्घकालीन टूरवर असायचे. त्यांच्या वागण्याबोलण्यातही बराच बदल झाला होता. त्यामुळे पत्नीला संशय आला. दिवसेंदिवस हा संशय अधिकच बळावला. त्यामुळे आपला पती नेमके करतो काय आणि जातो तरी कुठे याचा शोध घेण्याचे आरिफ यांच्या पत्नीने ठरवले. त्यासाठी त्यांनी पतीला खबर न लागू देता त्याच्या कारला एक जीपीएस ट्रॅकर लावला. (हेही वाचा, Extramarital Affair: विवाहितेचा प्रियकरासोबत गळफास, दोरी तुटली म्हणून महिला वाचली, एकाच मृत्यू)

आरिफ मांजरा हे आपली फॉर्च्युनर कार घेऊन जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या पत्नीला कारचे लोकेशन मिळायचे. कामाचे निमित्त देऊन आरिफ मांजरा यांच्या कारचे लोकेशन अनेकदा पुणे आढळून आले. 21 ऑक्टोबर 2020 या दिवशीही कार पुण्यात असल्याचे आढळुन आले. तसेच, ट्रॅकरवर पडलेल्या लोकेशननुसार ही कार पुणे शहरातील बावधन येथील 'व्हिव्हा ईन हॉटेल' येथे आढळून आली. पत्नीने गुगलच्या माध्यमातून 'व्हिव्हा ईन हॉटेल' चा फोन नंबर शोधून काढला. थेट हॉटेलवर फोन केला. तसेच, आरिफ मांजरा नामक व्यक्ती तिथे आहे का? याची चौकशी केली. हॉटेलने ही व्यक्ती हॉटेलमध्ये असल्याची माहिती दिली. तसेच, त्यांच्यासोबत कोण आहे असे विचारले असता त्यांच्यासोबत एक महिला असल्याची माहिती मिळाली. महिलेचे नाव विचारले असता ते नाव आरिफ यांच्या पत्नीचे असल्याचे आढळून आले. आपल्या नावने पतीसोबत भलतीच महिला असल्याचे पाहून पत्नीला चांगलाच धक्का बसला.

पत्नीने हॉटेलकडे अधिक माहिती विचारली असता महिलेने आपण संबंधित पुरुषाची (आरिफ मांजरा) यांची पत्नी असल्याचे हॉटेलला सांगितले होते. तसेच, त्यासाठी तिने आपल्या आधार कार्डची झेरॉक्सही दिली होती. शेवटी पत्नी थेट पुण्यात दाखल झाली. तिने प्रत्यक्ष पतीच्या विवाहबाह्य संबंधाचा भांडाफोड केला. तसेच, सोबत असलेल्या पत्नीबाबत चौकशी केली असता ती महिला चंदिगडची असल्याचे पुढे आले. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलिसांत 1 फेब्रुवारी 2022 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलीस प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.