नागपूर मारबत । Twitter/AIR News

नागपूर (Nagpur) मध्ये आज (27 ऑगस्ट) दोन वर्षांनंतर मारबत उत्सव (Marbat Festivalपार पडणार आहे. यंदा या मिरवणूकीचं 142 वं वर्ष आहे. मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे ही मारबत मिरवणूक निघू शकली नव्हती. मात्र यंदा नागपूरकरांनी मोठ्या जल्लोषात या मिरवणूक सोहळ्याला हजेरी लावली आहे. काळी आणि पिवळी मारबत ही या मिरवणूकीचं आकर्षण असते. जागनाथ बुधवारी व मस्कासाथ परिसरातून काळी व पिवळी मारबत शहीद चौक, मस्कासाथ परिसरात येऊन तेथे दोन्हीची गळाभेट केली जाते आणि नंतर त्यांची सुरुवात होऊन शेवटी दहन केले जाते. मग जाणून घ्या नेमका मारबत उत्सव का साजरा केला जातो? त्यामधील काळी आणि पिवळी मारबत कशाचं प्रतिनिधित्त्व करतात?

Marbat Festival Celebrations 2022 

पहा मारबत उत्सवाची धूम

प्राचीन काळापासून चालू असलेल्या मनुष्याला घातक ठरणाऱ्या रुढी-परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘काळी मारबत’ तर चांगल्या परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘पिवळी मारबत'. समाजातील अनिष्ट प्रथांना काढून टाकण्यासाठी तान्हा पोळ्याच्या दिवशी चांगल्या आणि वाईट प्रतीकांची मिरवणूक काढली जाते, ती ही काळी व पिवळी मारबत मिरवणूक आहे.

पुराणातील कथेनुसार, लोकांची अशी धारणा आहे की मायावी राक्षसाने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी स्त्रीचे रूप धारण केले होते. श्रीकृष्णाने तिला ठार मारले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर नेऊन जाळले. तेव्हापासून मारबत हा उत्सव साजरा होत असल्याचं सांगितलं जातं.

भोसले राजघराण्यातील बकाबाई या महिलेने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. तिच्या पतीने याला विरोध केला नव्हता. म्हणून त्याच्या पुतळ्याची मिरवणूक काढून निषेध करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या पुतळ्याला बडगे म्हणतात.