
Hingoli Crime News: हिंगोलीत एका तरुणाने आपल्या जन्मदाता आई वडिलांचा आणि भावाचा हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी हिंगोली येथील डिग्रस वाणी येथे मुलासह आई वडिलांचा अपघाता झाला होता आणि अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एक वेगळचं वळण बाहेर आणलं आहे. पोलिसांच्या तपासता असे आले की, हा अपघात नसून मोठ्या मुलानेच आई वडिलांचा आणि भावाचा खून केला आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- कुमठा गावात सापडला मुलाचा मृतदेह, तासाभरात उकलले गुढ, आरोपीला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिसांनी ११ जानेवारी रोजी झालेल्या अपघाताची तपसाणी सुरु केली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. आई वडिल आणि मुलांचा अपघात झाला होता. तर हा अपघात नसुन अपघाताचा बनावर करत मोठ्या मुलानेच आई वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासणीत उघडली आहे. महेंद्र जाधव असं आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अपघातानंतर महेंद्र जाधव याची चौकशी केली.
पोलिसांच्या चौकशीत असे दिसून आले की, महेंद्र याला आई वडिल पैसे देत नसल्यामुळे त्याने घरातील कुटुंह सदस्यांचा रागाच्या भरात खून केला. नातेवाईकांमध्ये पैस मागितल्याच्या कारणावरून बदनामी करत असल्याचा राग मनात महेंद्रच्या मनात होता. महेंद्रने क्राईम सिरीयल बघत स्वत:च्याच आई वडिल आणि भावाचा खून करण्याचं कट रचला. यामध्ये आरोपीने भाऊ आकाश जाधव आणि आई यांची हत्या केली. पोलिस ठाण्यात आरोपीने खूनाची कबुली केली.