Accident (PC - File Photo)

Hingoli Accident: महाराष्ट्रातील हिंगोली येथे एका रस्ते अपघातात एकाच  कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आई वडिलांना दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना अपघात झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात मुलासह आई वडिलांचाही मृत्यू झाला. हे कुटुंब हिंगोलीतील डिग्रस वाणी गावातील रहिवासी होते. तिघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा- राजाजी राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पात इलेक्ट्रिक वाहनाचा मोठा अपघात; चार वन अधिकाऱ्यांचा मृत्यू,)

मिळालेल्या माहितीनुसार, वाणी गावातील कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे आहेत. बुधवारच्या रात्री आकाश आपल्या वयोवृध्द आई वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे रुग्णालयात दुचाकीवरून घेऊन जात होता. दरम्यान त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीघांचा ही जागीच मृत्यू झाला. घटना रात्रीच्या वेळी घडल्याने उघडकीस आली नाही. त्यामुळे अपघाताची माहिती गुरुवारी सकाळी मिळाली

बाईक अनियंत्रित झाल्याने अपघात झाला. बाईक एका वळणावरून जाताना रस्त्याच्या शेजारी नाल्यात कोसळली आणि तिघेही बाईकवरून नाल्यात पडले. अंधाऱ्यात नाल्यात पडल्याने कोणालाच या अपघाताची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिघांनाही रात्रभर कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. गुरुवारच्या सकाळी दुध विक्रेते जात असताना हा अपघात झाल्याचं समजलं. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांना आणि जवळच्या पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि घटनास्थळी पंचनामा केला. घटनेची माहिती वाणी गावकऱ्यांना देण्यात आली.