Mumbai High Court (Photo Credit: ANI)

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध प्रकारची तयारी केली जात आहे. तसेच अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि पब्स नववर्षाच्या पार्टीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र उच्च न्यायालयाने पार्टीमध्ये गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब्समध्ये चित्रपटातील किंवा अल्बममधील गाणी कॉपीराईटशिवाय वाजवता येणार नाहीत. त्यामुळे हॉटेल मालकांना नवीन वर्षाची पार्टी कशी साजरी करायची हा प्रश्न पडला आहे. तर संगीत परवाना देणाऱ्या फोनोग्राफी परफॉर्मन्स लिमिटेड (PPL) मंडळाकडे 20 लाखापेक्षा अधिक गाण्यांच्या रेकॉर्डिंगचा हक्क देण्यात आले आहेत. मात्र उच्च न्यायालयात पीपीएलने याचिका दाखल केली असून हॉटेल मालकांनी परवानी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर पीपीएली ही कॉपीराईटस ठेवणारी मुख्य कंपनी नसल्याने त्यांनी परवाना शुल्क भरुन हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरंटमध्ये गाणी वाजवू शकता असे सांगितले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पंचतारांकित हॉटेलस मालकांनी पीपीएलचे परवाना शुल्क भरुन गाणी वाजवण्यास सांगितले आहे. मात्र गाण्याच्या कॉपीराईटशिवाया गाणी वाजवण्यास बंदी असल्याचे ही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.