Delhi Metro: मेट्रोत प्रवास करतना प्रवासी बड्या हवशीने व्हिडिओ (Video) आणि रिल्स (Reels) काढतात. सोशल मीडियावर मेट्रोत रिल्स आणि व्हिडिओचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालेलेला आहे. काही वेळा व्हिडिओ आणि रिल्ससाठी लोक विचित्र प्रकार करतात ज्यामुळे मेट्रोत इतर प्रवासांना याचा त्रास होतो. याचसंदर्भात (DRMC) डिआरएमसी दिल्ली मेट्रो रेल काॅपरेशन यांनी प्रवासांना यापुर्वी रिल्स आणि व्हिडिओ बाबत चेतावणी दिली होती. पण याला कोणतीही यश प्राप्त झाले नाही. प्रवाशांना वारंवार सांगून देखील ते रिल्स आणि व्हिडिओ बनवतात.
दिल्ली मेट्रोने यासदंर्भात अधिकृत अंकाउट वरून प्रवाशांना चेतावणी दिली. डिआरएमसी दिल्ली मेट्रो रेल काॅपरेशन सोशल मीडियाच्या अंकाउटवर लहानपणाची सर्वांना आवडणारी कविताचे वापर करत प्रवाशांना चेतावनी दिली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक युसर्सने कंमेट देखील केले आहे. हेही पहा- दिल्ली मेट्रो गर्लचे टिनी ब्रा
Open your camera, Na Na Na! #DelhiMetro pic.twitter.com/6hT6jxC007
— Delhi Metro Rail Corporation I कृपया मास्क पहनें😷 (@OfficialDMRC) June 16, 2023
जाॅनी जाॅनी येस पापा, मेकींग रिल्स इन मेट्रो नो पापा, अशा गंमतीशीर ओळीचा वापर करत लोकांना चेतावणी दिली आहे. एका युअर्सने यासदर्भांत रिल्स काढणाऱ्यावर दंड आकारा आणि त्यांच्यावर कारवाही करा, असे सांगितले आहे. तर एका युजर्सने काही लोक रिल्स बनवतात आणि मेट्रो पोस्टर बनवत आहे. अश्याने काही बदल होणारआहे का असा प्रश्न दिल्ली मेट्रोला विचारला आहे.