Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्राचे राजकारण समजून घ्यायचे आहे? मग वाचा ही काही राजकीय आत्मचरित्रे
politics | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राजकारण हा विष आपण अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातही अनुभवतो. मग ते ऑफिस असो किंवा नातेवाईक, सगळीकडे राजकारण असतंच. राजकारणाचं ज्याला ज्ञान असतं त्यांच्या अवतीभोवती कायमच श्रोत्यांची गर्दी असते, कारण राजकारणातील किस्से प्रत्येकालाच ऐकायला आवडतात. निवडणुकांच्या काळात तर या राजकीय विश्लेषकांना भलतंच महत्त्व असतं.

Maharashtra Assembly Election 2019: कमळ, हाताचा पंजा आणि घड्याळ, जाणून घ्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास

तुम्हालाही जर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी व राज्यकर्त्यांविषयी जाणून घेण्यात रुची असेल तर या निवडणुकांच्या काळात आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी काही खास माहिती. तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही खाली नमूद केलेली काही राजकीय आत्मचरित्रे नक्की वाचू शकता...

यशवंतराव चव्हाण (कृष्णाकाठ), प्र. के. अत्रे (कऱ्हेचे पाणी), शांताबाई दाणी (रात्रंदिन आम्हां), गोदावरी परुळेकर (जेव्हा माणूस जागा होतो), बी. जे. खताळ (अंतरीचे धावे), मोहन धारिया (संघर्षमय सफर), जी. डी. बापू लाड (एक संघर्ष यात्रा), भाऊसाहेब थोरात (अमृतमंथन), दत्ता देशमुख (मी दतूचा दत्ता झालो त्याची गोष्ट), मधु दंडवते (जीवनाशी संवाद), ग. प्र. प्रधान(माझी वाटचाल), सा. रे. पाटील (सा. रे. पाटील बोलतोय), शरद पवार (लोक माझे सांगाती), शरद जोशी (अंगारमळा), उषा डांगे (पण ऐकतं कोण ?), कमल देसाई (जय हो !), शंकरराव काळे (समाज अभियंता), शंकरराव कोल्हे (सत्याग्रही शेतकरी), यशवंतराव गडाख (अर्धविराम), राम नाईक (चरैवेति चरैवेति), राजू शेट्टी (शिवार ते संसद), सुभाष देसाई (सुभाष देसाई !), नारायण राणे (नो होल्ड्स बार्ड), मधू लिमये (आत्मकथा)