Helmet Compulsion In Mumbai: मुंबईत आता दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालणं सक्तीचं; पहा नियम मोडल्यास कितीचा दंड!
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबई मध्ये आता दुचाकी वरून प्रवास करणार्‍यांसाठी हेल्मेट (Helmet)  सक्तीचं करण्यात आलं आले आहे. दुचाकी चालवणार्‍या (Rider) सोबतच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही (Pillion) हेल्मेट घालावं लागणार आहे. आज मुंबई ट्राफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) याची माहिती देण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांचा मुंबईकरांना अल्टिमेटम असणार आहे. त्यानंतर चालक किंवा त्याच्या मागे बसलेली व्यक्ती विना हेल्मेट दिसली तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार, नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रूपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद केली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: New Helmet Laws: दुचाकी चालकांनो सावधान! हेल्मेट घातले तरीही होऊ शकतो 2,000 रुपयांचा दंड, जाणून घ्या नवा नियम .

मुंबई ट्राफिक पोलिसांचा आदेश

दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने बाईकस्वारांना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत बाईकवर मागे बसणार्‍या व्यक्तीला दंड आकारला जात नव्हता पण आता नव्या नियमावलीनुसार पुढील 15 दिवसांनंतर बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घातले नसेल तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

रस्ता सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई मध्ये मागील काही दिवसांत अनेक नियम कडक करण्यात आले आहेत. विरूद्ध दिशेने गाडी चालवणार्‍यांवरही आता बेदारकपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला जात आहे.