Mumbai Rain: मुंबईत आठवड्यात भरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. शुक्रवारीही शहरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. या मुसळधार पावसाने शहरात 25 झाडांच्या फांद्या कोसळल्याची बीएमसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहे. तर 11 शॉर्टसर्किट आणि 8 ठिकाणी भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. (हेही वाचा-अंधेरी सबवे मध्ये पाणी साचल्याने रस्ता वाहतूकीसाठी बंद)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत पूर्व उपनगरात ४७. ०७ मिमी, पश्चिम उपनगरात ४४. ६७ मिमी आणि शहरात ४३. ६८ मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवारी २७ सप्टेंबर पर्यंत कुलाबा वेधशाळेत 2633.6 मिमी पावसाची नोंद झाली आणि सांताक्रूझ वेधशाळेत 3068 मिमी पावसाची नोंद झाली.
सायन येथे झाड कोसळलं
View this post on Instagram
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सायन ब्रीजजवळ झाड कोसळलं आहे. ही घटना सांयकाळी ६च्या सुमारास घडली. मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळताच, घटनास्थळी मदत कार्य सुरु झाले.टॅक्सीवर झाड कोसळून तीन जण जखमी झाले. तिन्ही जखमींना सायन रुग्णालयात नेण्यात आले. दोघांना आवश्यक वैद्यकीय उपचारानंतर घरी सोडण्यात आले.