![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/04/Untitled-design-80-1-380x214.jpg)
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) काल नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात सादर केले आहे. Bandra Magistrate's Court मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा (Sedition) देखील लावण्यात आला आहे. दंडाधिकारी कोर्टाच्या अख्त्यारिमध्ये याबाबतचा निर्णय देण्याचा अधिकार नसल्याने आता नवनीत राणा यांची रवानगी भायखळा तर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड जेल किंवा तळोजा जेल मध्ये होण्याची शक्यता आहे.
कोर्टात आज राणा दाम्पत्याची बाजू अॅड. रिझवान मर्चंट यांनी मांडली आहे. रिझवान यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी राणांची सहज सुटका होऊ नये म्हणून 2 एफआयआर दाखल केल्याचं म्हटलं आहे. तसेच हिंदू धर्मीय असलेले आणि राम भक्त असलेल्या ठाकरेंच्या घरासमोर देवाचं गुणगाण गाणारं हनुमान चालिसा म्हणणं हा राजद्रोह कसा होऊ शकतो असा प्रतिसवाल केला आहे. इतर धर्मियांच्या घरासमोर जर पठण झालं असतं तर तो राजद्रोह ठरला असता असं त्यांचं मत आहे. सरकारी वकिलांना राजद्रोह का लावण्यात आला आहे? याचं समाधानकारक उत्तर कोर्टात देता आलं नसल्याचं रिझवान मर्चंट यांचं मत आहे. नक्की वाचा: मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना आव्हान देणाऱ्या Navneet Rana कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर .
When he was called upon by us to show that particular part of the remand application or those words which were supposed to have been uttered by the accused to show disaffection towards the state govt, he miserably failed: Rizwan Merchant, advocate of Navneet & Ravi Rana pic.twitter.com/1QTE1yEQEE
— ANI (@ANI) April 24, 2022
दरम्यान पोलिसांना 27 एप्रिल दिवशी त्यांची बाजू मांडण्याची मुदत कोर्टाने दिली आहे तर जामीनावर पुढील सुनावणी 29 एप्रिलला होईल असं सांगण्यात आले आहे. राणा दाम्पत्य आता जामीनासाठी वरील न्यायालयात दाद मागू शकणार आहे. दरम्यान सरकारी वकील म्हणून कोर्टात प्रदीप घरत बाजू मांडत आहेत.