Dombiwali Maratha kranti morcha

Mumbai News: मुंबईतील परळमध्ये काल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड केले होती. या प्रकरणात  मराठा क्रांतीच्या तीन कार्यक्रत्यांना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना दोषी ठरवले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. अटक केल्यानंतर या कार्यकर्त्यांची न्यायालयानं ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी शर्तींसह सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर डोंबिललीतील मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी तिघांचे भव्य सत्कार केला आहे. हे तीघंही संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळाली आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना वाहनाची तोडफोड करण्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराचा पत्ता त्यांच्या गाड्यांची माहिती या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मिळवून घेतली आणि थेट सदावर्ते यांचं परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असलेलं घर गाठून इमारतीसमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत त्यांनी तोडफोड केली.

यातील मंगेश साबळे हे महाराष्ट्र राज्यात चर्चेत आहे. अनेक आंदोलकामुळे त्याचा सहभाग असल्यामुळे चर्चेत असतात. मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे हे दोषी असल्याचे सांगितले.