
Loksabha Election 2024: देशात लोकसभा निवडणूकाची तारीख घोषित झाली आहे. अनेक राज्यात राजकिय घडामोडीचा वेग वाढला आहे. दरम्यान महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटप अजून ही झाला नाही. ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटातून लोकसभेत कोण उतराणात अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संयज राठोड यांचे नाव समोर आले आहे. ( हेही वाचा- अरविंद केजरीवाल यांना अटक; अबकारी धोरण प्रकरणी ईडीची कारवाई)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार आहे. दरम्यान संजय राठोड यांना लोकसभा लढवण्यासाठी भाजप दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यातच संजय राठोड यांना उमेदवारी दिल्यानंतर विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार का ? या कडे लक्ष लागले आहे.
संजय राठोज यांनी बंजारा समाजासाठी विकासाची कामे केली.पालकमंत्री संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास ठाकरे गटाला निवडणूक जड जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पत्रकारांशी बोलताना महायुती आघाडीच्या तयारी सुरु आहे. पुढे त्यांनी सांगितले की, यवतमाळ-वाशीम आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील. आम्ही प्रचारालाही सुरुवात केली आहे.