Sarpanch Post Reservation: सरपंच पद आरक्षण सोडतीकडे नाशिक जिल्ह्याचे लक्ष
Sarpanch | (Photo credit: archived, edited, symbolic images)

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा तर खाली बसला. आता सर्वांचे डोळे लागले आहेत ते सरपंच (Sarpanch) पद आरक्षण (Sarpanch Reservation) आणि निवडीकडे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 621 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या ग्रामपंचायती आणि इतर काही ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण आणि सोडत पार पडत आहे. सरपंच पद आरक्षण आणि सोडत हे सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी असणार आहे. मोठ्या संघर्षातून निवडूण आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या गटांनी समर्थकांनी आरक्षण आपल्या सोईयचे यावे यासाठी आपापल्या श्रद्धास्थानांचा, दैवतांचा धावा सुरु केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सरपंच पदासाठीचा आरक्षण मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाने निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 381 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला 429 ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील 1081 ग्रामपंचायतींसाठी पुढच्या पाच वर्षांसाटी सरपंच पदाची सोडत मार्च 2020 मध्येच पार पडणार होती. परंतू, मध्येच कोरोना संकट आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूक का अनिश्चित काळासाठी रद्द केल्या काही ठिकाणी निवडणूक कार्यक्रम स्थगित केले. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर पडली. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: भाजपचे 6000 सरपंच होतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा)

दरम्यान, नाशिक जिल्ह्यासाठी येत्या 28 तारखेला तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यात अनुसूचित क्षेत्राबाहेरच्या सुमारे 810 ग्रामपंच्यातींसाठीही सोडत काढली जाणार आहे. यात अदिवासी क्षेत्र समजल्या जाणाऱ्या पेठ,सुरगाणा,त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामपंचायतीचे आरक्षण या आधिच निश्चित आहे. त्यामुळे या तालुक्याचा यात समावेश नाही.

प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात आरक्षण सोडत कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल. अनुसूचित क्षेत्राबाहेरील 810 ग्रामपैंचायतींचे आरक्षीत सरपंच पदाच्या जागा खालीलप्रमाणे.

  • अनुसूचित जाती- 54
  • अनुसूचित जमाती- 110
  • मागास प्रवर्ग- 27
  • एकूण आरक्षित सरपंच पदं- 218

आरक्षण कसे असेल?

तालुका – एकूण ग्रामपंचायती - अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती - ओबीसी - सर्वसाधारण

देवळा -42 - 1 - 2 - 5 - 12

दिंडोरी - 121 - 1 - 1 - 5 - 10

इगतपुरी - 96 - 2 - 3 - 9 - 18

बागलाण - 131 - 4 - 12 - 22 - 43

नाशिक - 66 - 3 - 4 - 9 - 19

मालेगाव - 125 - 8 - 19 - 34 - 64

चांदवड - 90 - 6 - 13 - 24 - 47

नांदगाव - 88 - 6 - 13 - 24 - 45

निफाड - 119 - 9 - 18 - 32 - 60

येवला - 89 - 7 - 10 - 24 - 48

सिन्नर - 114 - 7 - 14 - 30 - 63

एकूण - 1081 - 54 - 109 - 218 - 429

दरम्यान, जिल्ह्यातील सरपंच पदासाठी महिला आरक्षणही असणार असून त्यासाठीची सोडत जिल्हाधिकारी कार्यालात पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षीत केल्या जाणार आहेत.