भाजप आमदार नितेश राणे यांनी गड राखल्याचे वृत्त आहे. नांदगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि पॅनलवर बहुमताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Live News Update: नांदगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, नितेश राणे यांनी गड राखला
महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल (Gram Panchayat Election Result) आज जाहीर होणार आहे. राज्यामध्ये सुमारे 7135 ग्रामपंचायतींचं भविष्य ठरणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून या निवडणूकांसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदारांनी कुणाचा बाजूने कौल दिला आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान मतमोजणीच्या वेळीस कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे.
34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत 18 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झालं.616 गावांमध्ये बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत. दरम्यान एकूण सरासरी 74% मतदान झाल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा नियम लागू केला आहे. त्यामुळे आता सदस्य निवडीसोबतच सरपंच देखील आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचा प्रयत्न हा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता आली नाही तरी सरपंच निवडून आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. Maharashtra Gram Panchayat Election 2022 Results Live Streaming: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे TV9 Marathi वर पहा थेट प्रक्षेपण .
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. अशाप्रकारे एकूण 7,751 जागी निवडणूका 18 डिसेंबरला पार पडल्या आहेत.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला होता. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला होता.