Gram Panchayat Election 2022: राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, उद्या 19 सप्टेंबरला मतमोजणी
ग्रामीण राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत निवणुकीसाठी (Gram Panchayat Election 2022) राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Gram Panchayat Elections) 608 गावांमध्ये मतदान पार पडत आहे.
ग्रामीण राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत निवणुकीसाठी (Gram Panchayat Election 2022) राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Gram Panchayat Elections) 608 गावांमध्ये मतदान पार पडत आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. परिणामी अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. एकूण ग्रामपंचायत निवडणुकांपैकी यवतमाळ आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. या दोन जिल्ह्यात अनुक्रमे 72 आणि 139 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान, सरपंचांची निवडही थेट निवडणुकीतून होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत आज दिवसभर मतदान पार पडेल. या मतदानाची मतमोजणी उद्या पार पडणार आहे.
राज्यात सत्तांतर झाल्याने पुन्हा एकदा थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेची पसंती आणि प्रतिसाद कसा मिळतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अनेक ठिकाणी या आधी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य वेगळ्या गटाचे आणि सरपंच वेगळ्या गटाचा झाला आहे. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी आल्याचेही पाहायला मिळाले आहे. (हेही वाचा, Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर)
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या,
नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75, धुळे: शिरपूर- 33, जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02, बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02, अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01, वाशीम: कारंजा- 04.
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01, यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08, नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06, परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04, नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17, पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02, अहमदनगर: अकोले- 45, लातूर: अहमदपूर- 01, सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08, कोल्हापूर: कागल- 01.
एकूण: 608
ग्रामपंचायत निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. त्यामुळे नेमका कोणता पक्ष सत्तेवर आला आहे हे अधिकृत सांगता येत नसले तरी, या निवडणुकांमध्ये सहभागी होणारे गट हे राजकीयच असतात. त्यामुळे कोणत्या विचारांच्या गटाल यश मिळाले यावर ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता याबातबअंदाज बांधला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2022 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

