Maharashtra State | (File Photo)

पंचायत राज (Panchayati Raj) सशक्तीकरणासाठी ICT Tools देशभर वापरला जातो. मात्र, देशभरातील सर्व राज्यांच्या तुलनेत हा Tools वापरण्यात महाराष्ट्र राज्य क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. त्यामुळे या अग्रेसरपणाबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

पंचायत राज व्यवस्था देशभरात राबवली जाते. महाराष्ट्र शासनानेही पंचायत राज व्यवस्था अधिक घट्ट करण्यासाठी वेळोवेळी विविध अभ्यासगट आणि समित्यांची स्थापना केली. हे अभ्यासगट आणि समित्यांनी देलेले अहवाल, काढलेले निष्कर्श ही व्यवस्था दृढ करण्यासाठी फायदेशीर ठरले.

देवेंद्र फडणवीस ट्विट

महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अधिक घट्ट करण्यासाठी एस.जी.बर्वे समिती १९६८, बोगिरवार समिती, १९७०, मंत्रिमंडळाची उपसमिती, १९८०, आणि पंचायत राज व्यवस्थेचे मुल्यमापन करण्यासाठी १९८४ साली प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल १९८६ साली सादर केला.