Gopichand Padalkar Post (Photo Credits: Twitter)

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस कारण मात्र जरा वेगळं आहे. आज गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar) यांची जयंती आहे हे तर आपण जाणून असाल. याच निमित्ताने पडळकर यांनी चांगल्या मनाने आगरकरांना अभिवादन करणारी एक खास पोस्ट शेअर केली होती मात्र या पोस्ट मध्ये गडबड अशी झाली की आगरकर यांच्या ऐवजी पडळकर यांनी लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांचा फोटो वापरला होता. अर्थात हे ट्विट चूक लक्षात येताच हटवण्यात आले मात्र तोपर्यंत हे ट्विट पाहिलेल्यांनी पडळकरांच्या ज्ञानावर चांगलाच निशाणा साधला आहे.

गोपाळ गणेश आगरकर यांची आज 164 वी जयंती आहे. आगरकर हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आहेत, त्यांची आणि टिळकांची मैत्री सुद्धा बरीच खास होती. आज जयंती निमित्त पडळकर यांनी अभिवादनपर ट्विट केले होते, अर्थात त्यात फोटोची गल्लत ही नजरचुकीने झाली असणार मात्र एवढी मोठी चूक कशी करू शकता अशा शब्दात अनेकांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

पहा गोपीचंद पडळकर यांची पोस्ट

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस म्हणत नायनाट झरी टीका केली होती,त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत ज्यांचा स्वतःच पक्ष त्यांचेच तिकीट इतक्यांदा कापतो त्यांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हणत उत्तर दिले होते.