मुंबई लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता गोरेगाव (Goregaon) ते पनवेल (Panvel) आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) (गोरेगाव ते सीएसएमटी) (Goregaon To CST) थेट गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच, आता वेस्टर्न लाईनच्या (Western Line) प्रवाशांना पनवेलला जाण्यासाठी वडाळा, अंधेरी किंवा कुर्ला येथे ट्रेन बदलावी लागणार नाही, तसेच सीएसटीला जाण्यासाठी दादर किंवा अंधेरी येथे ट्रेन बदलावी लागणार नाही. रेल्वेने उचललेल्या या पावलामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला आहे. या निर्णयामुळे सीएसएमटी ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या 44 फेऱ्या आता गोरेगावपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान सध्या ४२ सेवा सुरू आहेत. सध्या पनवेल ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या 18 फेऱ्या गोरेगावपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय सीएसएमटी आणि वांद्रेपर्यंत धावणाऱ्या २ फेऱ्याही गोरेगावपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या या निर्णयामुळे आता गोरेगावच्या एकूण फेऱ्या ४२ वरून १०६ पर्यंत वाढणार आहेत. हार्बर मार्गावरील फेऱ्यांची संख्या 614 पर्यंत वाढेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या 262 फेऱ्या असतील. मुंबई आणि आसपासच्या लोकल ट्रेनच्या एकूण फेऱ्या सध्या १७७४ आहेत. (हे ही वाचा Corona Vaccination Update: आता दोन डोस पुर्ण झालेल्या लोकांनाच मिळणार बेस्टच्या बसमध्ये एंन्ट्री, आजपासून लागू होणार नियम.)
पश्चिम मार्गावरील प्रवाशांना हार्बर मार्गावरील स्थानकांशी जोडण्यासाठी लोकल सेवा वाढविण्याची मागणी मुंबईकरांकडून सातत्याने होत होती. गोरेगाव ते हार्बर मार्गावर ज्या गाड्या आता धावत होत्या त्या कमी फेऱ्यांमुळे खूप उशिराने येत होत्या. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी प्रवासी अंधेरी, वडाळा किंवा कुर्ला येथे जाऊन वाशी, पनवेल मार्गावर गाड्या पकडत असत. तसेच मध्य मार्गावर गोरेगाव येथूनही गाड्या धावत होत्या. पण ती पण खूप उशिरा यायची. त्यामुळे दादरमध्ये गाड्या बदलणे लोकांना सोपे वाटले. मात्र आता गोरेगाव ते पनवेल आणि सीएसएमटी या थेट गाड्यांची वारंवारता वाढवण्यात आली असून प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.