Gold vs Silver Prices | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय सराफा बाजारात सोने दर 24 कॅरेटसाठी प्रति 1 ग्रॅम 8,787 रुपये, 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 1 ग्रॅम 8,055 रुपये आणि 18 कॅरेट प्रति एक 1 ग्रॅम सोन्यासाठी (ज्याला 999 सोने देखील म्हणतात) 6,591 आहे. सोमवार (24 फेब्रुवारी 2025) रोजी भारतातील सोन्याच्या किमतीत (Gold and Silver Prices Today) थोडीशी घसरण झाली. जो मागील दिवसाच्या तुलनेत 10 रुपयांनी कमी आहे. गुड रिटर्न्सवेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 22 कॅरट सोने दर प्रति ग्रॅम 8,055 इतका आहे तर 24 कॅरेट सोने दर प्रति ग्रॅम 8,787 रुपये इतका आहे. त्या तुलनेत 18 कॅरेट सोने दर काहीसा कमी असून, तो प्रति ग्रॅम 6,591 इतका आहे. दरम्यान, चांदी प्रति किलो 1,01,000 रुपये दराने विकली जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने दर

मुंबई

22 कॅरेट: 8,055 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

24 कॅरेट: 8,787 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट: 8,055 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

24 कॅरेट: 8,787 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

नाशिक

22 कॅरेट: 8,058 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

24 कॅरेट: 8,789 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट: 8,055 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

24 कॅरेट: 8,787 रुपये (प्रति 1 ग्रॅम)

भारतात सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम करणारे प्रमुख घटक

  • जागतिक मागणी: जगभरात सोने आणि चांदीची मागणी किमतीतील चढउतारांवर लक्षणीय परिणाम करते.
  • चलन विनिमय दर: सोने आणि चांदीच्या किमती निश्चित करण्यात अमेरिकन डॉलर आणि इतर जागतिक चलनांची ताकद महत्त्वाची भूमिका बजावते.
  • व्याजदर: वाढत्या व्याजदरांमुळे अनेकदा सोने आणि चांदी गुंतवणूकदारांसाठी कमी आकर्षक बनते, ज्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होतो.
  • सरकारी धोरणे: आयात शुल्क, कर आकारणी आणि सरकारी नियम भारतातील सोने आणि चांदीच्या किमतीवर परिणाम करू शकतात.
  • आर्थिक आणि भू-राजकीय घटना: राजकीय अस्थिरता, चलनवाढ दर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती बाजारातील अस्थिरतेला कारणीभूत ठरतात.

आर्थिक विश्लेषक सांगतात की, सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरी, आर्थिक अनिश्चिततेमुळे दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे. गुंतवणूकदारांना बाजारातील ट्रेंडवर लक्ष ठेवण्याचा आणि जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी किंमत सुधारणा दरम्यान खरेदी करण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला जातो.