कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) हळहळू शिथील होत आहे. सरकारने सरकारी कार्यालयांसोबतच खासगी कार्यालयांनाही 10 टक्के कर्मचारी उपस्थितीत मान्यता दिली आहे. असे असले तरी बहुतांश नागगरिक कोरोना व्हायरस संक्रमनाच्या भीतीने घराबाहेर पडणे टाळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अशा नागरिकांसाठी अवाहन केले आहे. आमदार रोहित पवार म्हणतात, 'नियमांच शस्त्र घेऊन बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्रॉंग करा'. आमदार पवार यांनी नागरिकांना ट्विटरद्वारे हे अवाहन केले आहे.
आमदार रोहित पवार यानी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''कोरोनाच्या भितीने अनेकांच्या मनात घर केलंय. पण आता ही भिती झुगारुन घरात न बसता बाहेर पडूनच कोरोनाशी लढावं लागणार आहेत. नियमांचं शस्र हाती घेऊन आपण बाहेर पडलो तर आपल्यावर हल्ला करण्याची संधीच कोरोनाला मिळणार नाही. म्हणून म्हणतो.... बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा''. (हेही वाचा, BEST बस ची सेवा सुरु होताच पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुफान गर्दी; सोशल डिस्टंसिंग चे तीन तेरा)
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी नागरिकांना घराबाहेर पडायचे अवाहन केले असले तरी, सोशल डीस्टन्सींग कसे पाळले जाणार हाही एक प्रश्न कायम आहे. कारण लॉकडऊन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आणि दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरु होणार असल्याचे समजताच नागरिकांनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली. खास करुन मुंबई शहरानजीक असलेल्या ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. वाहतुकीचे नियमही नागरिकानी न पाळल्याचे समोर आले. त्यामुळे सोशल डीस्टन्सींग पाळण्यासाठी सरकार काय पावले टाकणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.