Crowded BEST Bus (Image For Representation, Photo Credits: Youtube)

महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Governemnt) कालपासून मुंबईतील बेस्ट बस (BEST Bus) सेवा पुन्हा सुरु करण्यात आली, यावेळी 60 टक्के क्षमतेने बसच्या फेऱ्या सोडण्यात येणार, सोशल डिस्टंंसिंग (Social Distancing) साठी एकावेळी बस मध्ये केवळ 35 प्रवाशांना प्रवास नियम जाहीर करण्यात आले होते. मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांची इतकी गर्दी झाली की या सर्व नियमांचे बहुतांशी ठिकाणी तीन तेरा वाजल्याचे समजत आहे. बस स्टॉप वर तसेच बस च्या आताही अनेकदा नियमापेक्षा अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले होते. कालपासून अनेक खाजगी कार्यालये सुद्धा 10 % उपस्थिती सहित सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, या कार्यालयांच्या वेळा या कमी अधिक फरकाने एकच असल्याने एकाच वेळी ही गर्दी झाल्याचे सांगितले जात आहे. Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद

 प्राप्त माहितीनुसार, कालच्या एका दिवसात BEST तर्फे एकूण 2200 बस चालवण्यात आल्या, यातून जवळपास 5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. हे प्रवासी ऑफिस ला जाणारे तसेच छोटे व्यापारी. इत्यादी होते. या सर्वांच्या वेळा या साधारण सकाळच्या होत्या त्यामुळेच बस मध्ये आणि बस स्टॉप वर सकाळी 8 ते 10 दरम्यान आणि संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान अधिक गर्दी दिसून आली होती. बस स्टोपवर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बस मध्ये सुद्धा उभे राहून प्रवास करणाऱ्यांच्या ठरवण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक जण प्रवास करत होते.

 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार डोंबिवली येथील फडके रोड बस स्थानकात जवळपास 1 किमी लांब प्रवाशांनी रांगा लावल्या होत्या.याशिवाय कुर्ला बस डेपो, शिवाजी नगर, प्रतीक्षा नगर बस डेपो इथे सुद्धा मोठ्या संख्येत प्रवासी दिसून आले होते. Unlock 1: नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रवाशांसाठी 215 बसेसव्दारे 858 बस फेऱ्यांची सुविधा उपलब्ध

 दरम्यान, हा सर्व गोंधळ केवळ प्रवासाची वेळ एकच असल्याने होत आहे त्यामुळे ऑफिस तर्फे वेळेत थोडाफार बदल केल्यास आपल्याला बस प्रवास सुरक्षित आणि सुरळीत करण्यास मदत होईल असे बेस्ट तर्फे सांगण्यात आले. यानुसार आता खाजगी कार्यालये काय निर्णय घेतात हे पाहणे आवश्यक आहे.