कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळे सर्वत्र अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका (NMMT) परिवहन उपक्रमाने लॉकडाउनचे उद्दिष्ट साध्य व्हावे. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता नवी मुंबईचे महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ (Annasaheb Misal) यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे ठिकाण ते निवासस्थान या दरम्यान बस सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा पुरवित असताना कर्मचारी संख्या , कामाच्या वेळा आणि सोशल डिस्टिन्सींगच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेनच्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात प्रवासावरील निर्बंध उठवले आहे. याच पार्श्वभूमीवर 8 जून 2020 पासून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने लॉकडाउन कालावधीतील अत्यावश्यक दैनंदिन बसेसच्या फेऱ्यांचे सेवा दिली जात आहे. सर्वसामान्य प्रवासी नागरिकांसाठी तसेच सरकारी, खाजगी कार्यालयातील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सोशल डिसिन्सींगच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. दरम्यान, प्रवाशांना मास्क परिधान बंधनकारक करण्यात आले आहे. बसमधील आसन क्षमतेच्या 50 टक्के आणि 5 किंवा 3 प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे देखील वाचा- शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही, अशी तक्रार येता कामा नये; राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुचना

नवी मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

रुग्णालय, पोलीस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱी यांना त्यांच्या निवासस्थानपासून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी नवी मुंबई शहर तसेच ठाणे, कल्याण बदलापूर, डोंबिवली, पनवेल, उरण, चेंबूर, मानखूर्द, दहिसर, खारघर, उलवे इत्यादी ठिकाणाहून बस सेवा पुरवली जात आहे.