Thane: कोरोनावरील लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांसह कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या स्टाफसाठी ठाणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जाहीर करत असे म्हटले की, अद्याप कोविड वरील लस न घेतलेल्यांचे पगार थांबवावेत. म्हस्के यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, हा निर्णय महापालिकेचे आयुक्त आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
प्रशासनाकडून पुढील काही दिवसात या संदर्भात नोटिफिकेशन सुद्धा काढले जाणार आहे. त्याचसोबत राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने कोविडवरील लस घ्यावी असे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कायमस्वरुपी आणि तत्काळ रुपात काम करणाऱ्या स्टाफला लवकरात लवकर लस घेण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांना त्यांचा पगार थांबवला जाईल असे म्हसके यांनी म्हटले आहे.
ठाणे महापालिकेचे कर्मचारी हे फ्रंट लाइन वर्कर्स असून त्यांचे प्र्थम पूर्णपणे लसीकरण झालेले असावे. आम्ही त्यांना लसीचा डोस घेण्यासाठी खुप वेळ दिला पण आता आम्ही ठोस पावले उचलत त्यांच्यासह शहराच्या भल्यासाठी निर्णय घेतला आहे.(Ahmednagar Civil Hospital Fire Incident: मृतांच्या परिवाला 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची राजेश टोपे यांची माहिती)
ठाणे महालिकेच्या आरोग्य विभाग, आयुक्त मनीष जोशी यांनी असे म्हटले की, ठाणे महापालिकेतील सर्वच जणांनी लसीकरण पूर्ण केलेले नाही. काहींनी तर लसीचा पहिला डोस सुद्धा घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक मर्यादित कालावधी ठरवला आहे. त्याचसोबत त्यांनी लस घेतल्याचा पुरावा हा संबंधित विभागाच्या प्रमुखांना दाखवावा. अन्यथा त्यांचा पगार दिला जाणार नाही असे जोशी यांनी सांगितले.