भारताचे प्रवेशद्वार म्हणून ‘गेट वे ऑफ इंडिया’ (Gateway of India) मुंबईच्या सागरी तटावर एखाद्या आभूषणासारखे मिरवत आहे. वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना, कलात्मक मुंबईचा एक अविभाज्य घटक, भारताचे भूषण आणि पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण असलली ही कमानवजा इमारत, गेली 94 वर्षे खळाळनाऱ्या लाटांना तोंड देत दिमाखात उभी आहे. 4 डिसेंबर 1924 रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले होते, आणि तेव्हापासून ही इमारत पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. चला पाहूया या वास्तूबद्दल काही महत्वाच्या बाबी
> इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज आणि त्याची पत्नी क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी अपोलो बंदर येथे एक कमानीवजा मंडप उभारण्यात आला होता. नंतर या राजाच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ जॉर्ज विट्टेट या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू साकार झाली.
> 31 मार्च 1911 साली या वास्तूची पायाभरणी करण्यात आली. ही रचना बेसॉल्टची असून ती 26 मीटर (85 फूट) उंचीची कमान आहे.
> नंतर गेटवे व्हिक्टोरियासाठी आणि बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आले. आणि त्यानंतर तिथून भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली गेली.
> गेटवे ऑफ इंडिया सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकेलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पिवळ्या बसातर दगडात या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे.
> वास्तूवरील घुमट व सज्जे सलोह कॉंक्रीटचे आहेत. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे.
> या अद्वितीय वास्तूच्या उभारणीसाठी तब्बल अकरा वर्ष लागले, आणि यासाठी त्याकाळी 2.1 दशलक्ष इतका खर्च आला होता.
> 25 ऑगस्ट 2003 रोजी एका बॉम्बस्फोटामुळे गेटवे समोर रक्तस्राव झाल्यामुळे या स्मारकपुढे मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती. स्फोटच्या शक्तीने अनेक लोक समुद्रात उडून पडले असल्याची नोंद आहे
> इथेच इंग्रजांच्या महासत्तेचा शेवटचा अध्याय पार पडला होता, कारण फेब्रुवारी 1948 ला ब्रिटीशांची भारतातील शेवटची बटालीयन याच ‘गेट वे ऑफ इंडिया’ दरवाजातून ब्रिटीश जहाजांवरून पाठवण्यात आली होती.