Ganpati Visarjan 2019: देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावरील बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन (Watch Video)
Devendra Fadnavis Ganpati Visarjan (Photo Credits: Twitter)

आज (12 सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशीच्या (Ananth Chaturdashi 2019) निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. यंदा हा सोहळा पर्यावरणपूरक  पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले गेले होते, हेच प्रयत्न पुढे नेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी म्हणजेच मुंबईतील वर्षा (Varsha) बंगल्यावर काही वेळापूर्वी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्षा बंगल्यावर 10 दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले होते. ही मूर्ती पूर्णतः इको फ्रेंडली असून विसर्जनासाठी देखील कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व कन्येसह आज बाप्पाला निरोप दिला. तसेच "गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस,अर्थात पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच" असे म्हणत त्यांनी काही खास क्षण सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते.

देवेंद्र फडणवीस ट्विट

दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह आणि सोहळा हा पाहण्यासारखा असतो. दहा दिवस यथायोग्य आदरातिथ्य केल्यांनतर आज वाजत गाजत मिरवणूक काढून बाप्पांना अलविदा केले जाते. यंदा पर्यावरणपूरक सणाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी कृत्रिम तलाव बांधून बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले, तर दुसरीकडे प्रसिद्ध मंडळांपैकी अनेक बाप्पांची विसर्जन मिरवणूक सध्या सुरु आहे.