Aaditya Thackeray: गणपती बाप्पांच्या दर्शनावेळी पत्रकारांकडून राजकीय प्रश्न, आदित्य ठाकरे यांचे 'स्मार्ट' उत्तर
Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा हादरा बसला. राज्यात सत्तांतरही झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनंतर काँग्रेस पक्षातीलही काही आमदार फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. यावरुन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाला मिश्कीलपणे बगल दिली. मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला (2 सप्टेंबर) आले असता प्रसारमाध्यमांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारले. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्याला बगल दिली.

शिवसेनेतील बंडानंतर आता काँग्रेसमधीलही काही आमदार फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता 'सध्या गणपती उत्सव सुरु आहे. मी गणपतीच्या दर्शनाला आलो आहे. उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही', असे स्मार्ट उत्तर देत आदित्य यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली. पत्रकारांनी अधिकच जोर देत विचारले असता, 'आपण जर तर वर बोलुया नको. त्यापेक्षा गणपतीचे दर्शन घेऊ' असे आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Agniveer Bharti: अग्निवीर, पोलीस भरती मेळाव्यासाठी सहकार्य करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश)

कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर लोक उत्सवांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे लोकांना तो आनंद घेऊ द्यात. त्यातही जर कोणी राजकारण आणत असेल किंवा राजकारण करत असेल तर तो बालीशपणा आहे. उत्सवातही जर कोणी इतके राजकारण आणत असेल तर लोकांना राजकारणाचाही कंटाळा येईल. लोक सर्वच काही पाहात असतात. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन आपणही लोकांसोबत उत्सवाचा आनंद घेऊ, असे राज ठाकरे म्हणाले.