Indian Railway (Photo Credits-Pixabay)

मुंबईमधील चाकरमान्यांना पावसाचे दिवस सुरू झाले की गणेशोत्सवाची (Ganeshotsav) ओढ लागते. मागील वर्षी कोरोना संकटामुळे अगदीच घरगुती स्वरूपात हा सण साजरा झाला होता पण यंदा कोरोना संकट मुंबई, पुण्यात थोडं निवळल्याने मुंबईमधून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांमध्ये गणपतीला गावी जाण्याची ओढ आहे. दरवर्षी चाकरमान्यांची गावी जाणार्‍यांची संख्या आणि गर्दी पाहता आता मध्य रेल्वेसोबतच पश्चिम रेल्वे (Western Railway) कडूनही तयारी सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वे कडून 38 विशेष फेर्‍यांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. तर या रेल्वे गाड्यासाठी 11 ऑगस्ट पासून बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 3 सप्टेंबर पासून या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यासाठी 8 रेल्वे चालवल्या जातील अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. नक्की वाचा: Ganpati Festival Special Trains 2021: गणपतीत मध्य रेल्वे सोडणार कोकणासाठी नव्या 40 रेल्वे गाड्या, जाणुन घ्या वेळापत्रक.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट पासून आयआरसीटीसी च्या वेबसाईट वर आणि PRS काऊंटर वर तिकीट विक्री सुरू केली जाणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे या मुंबई सेंट्रल, वांद्रे, अहमदाबाद येथून कोकणात कुडाळ, मडगाव या स्थानका दरम्यान चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे ट्वीट

पश्चिम रेल्वे मार्गावरील या ट्रेन मध्ये प्रवास करताना तसेच चढता-उतरताना प्रवाशांना कोविड 19 नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे. प्रवासादरम्यान नागरिकांनी आयडी प्रुफ जवळ ठेवणं आवश्यक असल्याचं आवाहन देखील रेल्वे प्रशासनाने केले आहे. या गणेशोत्सव विशेष रेल्वे फेर्‍या पूर्णपणे केवळ आरक्षित असणार आहे. तसेच त्याकरिता स्पेशल तिकीट दर असतील.