कोकण (Konkan) भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांची (Passenger) अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) 40 अतिरिक्त गणपती महोत्सव (Ganpati) विशेष चालवणार आहे. हे गणपती सण 2021 दरम्यान आधीच घोषित 72 सण विशेष व्यतिरिक्त आहे. या वर्षी 10 दिवसांचा उत्सव गणेश चतुर्थी 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. कन्फर्म तिकीट (Confirm ticket) असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्य स्थानादरम्यान कोविड 19 (Corona 19) शी संबंधित एसओपी, सर्व नियमांचे पालन करणाऱ्या या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल. खास गणपतीसाठी या गाड्या चालू केल्या आहेत. गणपतीत कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रेल्वेत (Railway) गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दरम्यान कोणत्या ट्रेन (Train) सोडणार याची यादी पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई-सावंतवाडी रोड
01235 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 सप्टेंबर 2021 ला 13.10 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 02.00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. 01236 विशेष 10 सप्टेंबर 2021 रोजी सावंतवाडी रोडवरून 02.30 वाजता सुटेल. त्याच दिवशी 14.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
पनवेल-सावंतवाडी रोड विशेष
01237 विशेष पनवेलहून 8 सप्टेंबर 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी 14.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सावंतवाडी रोडला 02.00 वाजता पोहोचेल. 01238 विशेष 8 सप्टेंबर 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी सावंतवाडी रोडवरून 02.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.00 वाजता पनवेलला पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव विशेष
01239 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 5 सप्टेंबर 2021, 7 सप्टेंबर 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी 05.33 वाजता सुटेल. त्याच दिवशी 20.00 वाजता मडगावला पोहोचेल. 01240 स्पेशल मडगाव येथून 5 सप्टेंबर 2021, 7 सप्टेंबर 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी 20.30 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ विशेष
01241 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 3 सप्टेंबर 2021, 7 सप्टेंबर 2021 आणि 10 सप्टेंबर 2021 रोजी 00.45 वाजता सुटेल. त्याच दिवशी 11.20 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. 01242 स्पेशल कुडाळ येथून 5 सप्टेंबर 2021, 8 सप्टेंबर 2021 आणि 12 सप्टेंबर 2021 रोजी 12.10 वाजता सुटेल. त्याच दिवशी 23.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
पनवेल-कुडाळ विशेष
01243 विशेष पनवेल 4 सप्टेंबर 2021, 8 सप्टेंबर 2021 आणि 11 सप्टेंबर 2021 रोजी 00.15 वाजता सुटेल. त्याच दिवशी 11.20 वाजता कुडाळला पोहोचेल. 01244 विशेष 3 सप्टेंबर 2021, 7 सप्टेंबर 2021 आणि 10 सप्टेंबर 2021 रोजी 12.10 वाजता कुडाळहून सुटेल. त्याच दिवशी 23.10 वाजता पनवेलला पोहोचेल.
पनवेल-कुडाळ विशेष
01245 विशेष पनवेलहून 5 सप्टेंबर 2021 आणि 12 सप्टेंबर 2021 रोजी 00.15 वाजता सुटेल. त्याच दिवशी 11.20 वाजता कुडाळला पोहोचेल. 01246 स्पेशल कुडाळहून 4 सप्टेंबर 2021 आणि 11 सप्टेंबर 2021 रोजी 12.10 वाजता सुटेल. त्याच दिवशी पनवेलला 23.00 वाजता पोहोचेल.
पुणे-मडगाव/करमाळी-पुणे विशेष
01247 विशेष 8 सप्टेंबर2021 रोजी पुण्याहून 18.45 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता मडगावला पोहोचेल. 01248 विशेष 10 सप्टेंबर 2021 रोजी करमाळीहून 15.10 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पुण्याला पोहोचेल.
पनवेल-करमाळी/मडगाव-पनवेल विशेष
01249 विशेष 10 सप्टेंबर 2021 रोजी पनवेलहून 00.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.15 वाजता करमाळीला पोहोचेल. 01250 विशेष 9 सप्टेंबर 2021 रोजी मडगावहून 11.30 वाजता सुटेल. त्याच दिवशी पनवेलला 23.00 वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्या व्यतिरिक्त आधीच जाहीर केलेल्या खालील विशेष गाड्या अतिरिक्त सेवा चालवतील. 01227 मुंबई-सावंतवाडी रोड विशेष 4 सप्टेंबर 2021 ला चालेल. 01228 सावंतवाडी रोड-मुंबई विशेष 4 सप्टेंबर 2021 ला. तर 01229 मुंबई-रत्नागिरी 3 सप्टेंबर 2021 रोजी विशेष चालेल. 01230 रत्नागिरी-मुंबई विशेष 5 सप्टेंबर 2021 ला चालेल. 01234 रत्नागिरी-पनवेल विशेष 3 सप्टेंबर 2021 ला. 01231 पनवेल-सावंतवाडी रोड 4 सप्टेंबर 2021 रोजी विशेष 01232 सावंतवाडी रोड-पनवेल विशेष 4 सप्टेंबर 2021 ला चालेल. तर 01233 पनवेल-रत्नागिरी 5 सप्टेंबर 2021 ला विशेष चालणार आहे.
वरील अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी बुकिंग आणि विशेष शुल्कावर आधीच घोषित केलेल्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त सहली 07 सप्टेंबर 2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होतील. सविस्तर थांब्या आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.