Photo Credit- X

Mumbai Local Accident: लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. लाखो मुंबईकर दररोज लोकलमधून शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचतात. कोणी कामानिमित्त, कोणी पर्यटासाठी लोलकचा प्रवास करतो. अशातच डोंबिवली स्थानकात (Dombivli railway station)सकाळी एका अपघातात एक महिला रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकली(stuck between railway track and train ). सुदैवीने महिला बचावली. मात्र, या अपघाताने इतर प्रवासी घाबरले. लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेला आणि महिलेचा अपघात झाला. (हेही वाचा: Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video))

मुंबई लोकलमधून दररोज जवळपास 63 लाख प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल जाते. त्यामुळे तेथे दररोज अपघात होताना दिसतात. मात्र, सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्लॉटफॉर्म ५5वर मोठी दुर्घटना होता होता टळली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेचा तोल गेल्याने ती रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनच्यामध्ये अडकली. मानसी संजय किर असे या महिलेचे नाव असून ती 28 वर्षांची आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडीओही व्हायरल झाला आहे.(हेही वाचा: Mumbai Local Accident: लोकल मधील गर्दीत दादगिरी करत चौघांनी ढकललेला प्रवासी ट्रॅक वर पडला, हात गमवला; आरोपींचा तपास सुरू)

व्हिडीओत महिला रेल्वे ट्रॅक आणि लोकलमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक प्रवाशांची गर्दी आहे. डोंबिवली जीआरपी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीने तिला सुखरुप बाहेर काढलं जात. सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. आज सकाळी 8.33 च्या सुमारास ही घटना घडली.

पायाला किरकोळ दुखापत

कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल डोंबिवलीस्थानकावर आली. महिला गाडी पकडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकली. तब्बल 20 मिनिटे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर रेल्वे पोलीस, डोंबिवली जीआरपी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीने या महिलेस सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या महिलेला पायाला किरकोळ दुखापत झाली.