Photo Credit- X

Microsoft outage disrupts flight: मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड(Microsoft Outage)झाल्याचा फटका भारतासह जगभरातील विमानतळांना बसला. मुंबईसह, दिल्ली, बंगळूर, कोलकाता, पुणे विमानतळावरील अनेक उड्डाणे त्यामुळे रद्द झाली. मुंबई विमानतळावर(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)ही प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. विमानतळावर आलेल्या प्रवाशांची (Passenger)गैरसोय झाली. त्यामुळे बोर्डिंग आणि चेक-इन यंत्रणा ठप्प झाल्याने विमान कंपन्यांच्या काऊंटरवर प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रवाशांना रात्रभर विमानतळावर थांबावे लागले. प्रवाशांनी त्याबाबतची तक्रार केली आहे. या तांत्रिक बिघाडाचा परिणाम म्हणून इंडिगोने देशातील सुमारे 200 उड्डाणे रद्द केली. जगभरातील ट्रॅव्हल सिस्टम आउटेजच्या कॅस्केडिंग इफेक्टमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली. (हेही वाचा:Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन; शेअर बाजार, बँकिंगसह बंद झाल्या 'या' सेवा)

विमान प्रवासाचे बुकिंग आणि चेक-इन सेवा बंद झाल्यामुळे एअर इंडिया, इंडिगो, आकसा एअरलाईन्स आणि स्पाइसजेटची सेवा खंडित झाली आहे. काही एअरलाईन्सनी प्रवाशांना हाताने लिहिलेले बोर्डिंग पास दिले. यामुळे विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याची विनंती केली. हाताने बोर्डिंग पास देण्याची पद्धत कम्प्युटर प्रचलित होण्याआधी वापरली जात होती.