Gambling Den Busted In Khar: खारच्या उच्चभ्रू इमारतीत जुगाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश, 45 जणांसह 12 महिलांना अटक, (Watch Video)
Gambling Den Busted In Khar (PC - Twitter/@bandrabuzz)

Gambling Den Busted In Khar: खार (Khar) पश्चिममधील ओम पॅलेस, आंबेडकर रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखा युनिट-9 ने छापा टाकला. गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे 1 च्या सुमारास छापा टाकून एकूण 45 जणांना अटक केली. ज्यात जुगार अड्ड्याचे 4 भागीदार, ग्राहकांना जुगार खेळण्यास मदत करणारे जॉकी नावाचे तीन सहाय्यक आणि जुगार खेळणाऱ्या 38 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये 12 महिला आणि 33 पुरुषांचा समावेश आहे. फ्लॅटचा मालक समीर आनंद पोलिसांच्या 'वॉन्टेड' श्रेणीत आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 50 हजार रुपये 1 कोटी 1 लाख 50 हजार रुपये किमतीची जुगाराची नाणी 34 लाखांची रोकड जप्त केली.

प्राप्त माहितीनुसार, क्राइम ब्रँचला बेकायदेशीर जुगाराची माहिती मिळाली होती. तसेच थ्री-कार्ड रम्मी आणि पोकर यांसारख्या खेळांसह उच्च स्टेक्स जुगाराच्या अनेक तक्रारी देखील मिळाल्या होत्या. ओम पॅलेस सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटवर गुन्हे शाखेने छापा टाकला. (हेही वाचा -UP Shocker: जुगारात हरल्यानंतर पतीने पत्नीला ठेवले गहाण; महिलेच्या भावाने येऊन वाचवली लाज, गुन्हा दाखल)

पोलिसांना फ्लॅटमध्ये सापडला जुगाराचा संपूर्ण सेटअप -

गुन्हे शाखेच्या पथकाला पोकर आणि तीन पत्त्यांचा जुगार मोठ्या रकमेसाठी खेळला जात असल्याचे आढळले. बंद फ्लॅटमध्ये जुगार खेळण्यास मदत करणाऱ्या तीन जॉकींसह 38 जणांना शोधून काढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जुगाराचा अड्डा चार भागीदारांद्वारे चालवला जात होता. जुगार खेळणे सोपे व्हावे यासाठी ग्राहकांना विविध रंगांची आणि किमतीची प्लास्टिकची नाणी देण्यात आली होती. (हेही वाचा -Kolhapur News: जुगार खेळताना पोलिसांचा अड्ड्यावर छापा; कारावाईच्या भीतीने तीन तरुण 'स्पायडर मॅन', इमारतीवरुन ठोकल्या उड्या, एकाचा मृत्यू)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, या कारवाईचे नेतृत्व करणारे गुन्हे शाखा, युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले की, 'मालकाच्या संमतीशिवाय त्याच्या फ्लॅटमध्ये एवढा मोठा जुगार अड्डा चालवणे अशक्य आहे. या फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात आहे. या जुगारात कोणत्याही सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी व्यक्तींचा सहभाग नव्हता.'