Kolhapur News: जुगार खेळताना पोलिसांचा अड्ड्यावर छापा; कारावाईच्या भीतीने तीन तरुण 'स्पायडर मॅन', इमारतीवरुन ठोकल्या उड्या, एकाचा मृत्यू

पोलिसांच्या कारवाईला घाबरुन चक्क उंच इमारतीवरुन उडी मारणे तीन तरुणांना चांगलेच भोवले आहे. ही घटना कोल्हापूर (Kolhapur) शहरात घडली. शहातील राजेंद्रनगर परिसरात काही तरुण जुगार (Gambling) खेळतात. परिसरातीलच एका इमारतीवर त्यांचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकला.

Kolhapur News: जुगार खेळताना पोलिसांचा अड्ड्यावर छापा; कारावाईच्या भीतीने तीन तरुण 'स्पायडर मॅन', इमारतीवरुन ठोकल्या उड्या, एकाचा मृत्यू
Gambling | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पोलिसांच्या कारवाईला घाबरुन चक्क उंच इमारतीवरुन उडी मारणे तीन तरुणांना चांगलेच भोवले आहे. ही घटना कोल्हापूर (Kolhapur) शहरात घडली. शहातील राजेंद्रनगर परिसरात काही तरुण जुगार (Gambling) खेळतात. परिसरातीलच एका इमारतीवर त्यांचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकला. या वेळी पोलीस कारवाईच्या भीतीने काही तरुणांनी चक्क इमारतीवरुन उड्या टाकल्या. यात एका तरुणाचे डोके दगडावर आपटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीराचे काही अवयव मोडले. तसेज गंभीर दुखापतही झाली. ही घटना काल (18 जून) रोजी घडली.

साहिल मनेकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जखमी झालेल्यापैकी एकाचे नाव दत्तात्रय देवकुळे आहे. अन्य एकाचे नाव समजू शकले नाही. अधिक माहिती अशी की, राजेंद्रनगर परिसरातील दुमजली इमारतीवर काही तरुण जुगार खेळत असत. तिथे त्यांचा अड्डाच होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. प्राप्त माहितीवरुन पोलिसांनी रात्री 11 वाजणेच्या सुमारास अड्ड्यावर छापा टाकला. (हेही वाचा, Kolhapur News: गर्लफ्रेंडने प्रियकराला मध्यरात्री घरी एकांतात बोलावले, पण घात झाला; कुटुंबीय परतले, पुढे नको ते घडले)

पोलीस आल्याचे समजताच तरुणांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी वाट मिळेल त्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. पळापळ करत असताना काही तरुणांनी इमारतीवरुन उड्या टाकल्या. यात एका तरुणाचे डोके दगडावर आपटले. मार वर्मी लागल्याने सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर पोलिसांनी तरुणाचा (साहिल मनेकर) मृतदेह ताब्यात घेतला असून 'सीपीआर'मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. साहिल हा खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत असे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.

दरम्यान, कोल्हापूर प्रमाणेच भंडारा शहरातही पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. भंडारा पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा आणि जवाहरनगर पोलीस यांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत सावरी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाआत आठ जणांवर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींपैकी पाच जण हे जवाहरनर ऑर्डनन्स फॅक्टरीत कामाला आहेत. पलिसांनी या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करुन पकडलेल्या आरोपींमध्ये भिमराव लाडे (वय 65 वर्षे), भारत बारई (वय 40 वर्षे), निलेश जांभुळकर (वय 36 वर्षे), अमरदीप वालदे (वय 46 वर्षे), अशोक गजभिये (वय 55 वर्षे), होमचंद धकाते (वय 42 वर्षे), प्रमोद सतदेवे (वय 32 वर्षे) सुजित कावळे (वय 50 वर्षे) यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात जवाहरनकर पोलीस दप्तरी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).