Fuel Price in Maharashtra: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोलने गाठली शंभरी, जाणून घ्या राज्यात काय आहे आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण (Photo Credits: ANI)

इंधन दरवाढीमुळे (Fuel Price in Maharashtra) अन्नधान्य, भाजीपाल्यापासून सर्व वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना या इंधनदरवाढीचा चांगलाच फटका बसला आहे. यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पेट्रोल (Petrol) 90 च्या पार गेली आहे. तर राज्यात एका जिल्ह्यात तर पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. रोजच्या इंधनदरवाढीने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. मात्र आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर स्थिर असून एका जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.

GoodReturns या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. यात मुंबईत पेट्रोलचे आजचे दर 97.57 रुपये प्रति लीटर इतके असून डिझेलचे दर 88.60 रुपये प्रति लीटर इतके आहे.हेदेखील वाचा-मुंबई: पेट्रोल दरवाढीमुळे दुचाकीस्वार पेट्रोल इंजिनऐवजी बसवू लागलेत बॅटरी, महागाईपासून वाचण्यासाठी मुंबईकरांची नवी शक्कल

जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 98.07 ₹ 87.74
2 अकोला ₹ 97.52 ₹ 87.23
3 अमरावती ₹ 98.30 ₹ 87.99
4 औरंगाबाद ₹ 97.87 ₹ 87.54
5 भंडारा ₹ 98.07 ₹ 87.76
6 बीड ₹ 98.67 ₹ 88.33
7 बुलडाणा ₹ 97.85 ₹ 87.55
8 चंद्रपूर ₹ 98.36 ₹ 88.04
9 धुळे ₹ 97.94 ₹ 87.62
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27
12 मुंबई उपनगर ₹ 97.71 ₹ 88.74
13 हिंगोली ₹ 98.44 ₹ 88.12
14 जळगाव ₹ 98.27 ₹ 87.94
15 जालना ₹ 98.88 ₹ 88.51
16 कोल्हापूर ₹ 97.69 ₹ 87.39
17 लातूर ₹ 98.67 ₹ 88.33
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.55 ₹ 88.21
22 नाशिक ₹ 97.65 ₹ 87.32
23 उस्मानाबाद ₹ 98 ₹ 87.68
24 पालघर ₹ 97.23 ₹ 86.89
25 परभणी ₹ 100.06 ₹ 89.64

या दरावरून परभणीत पेट्रोलचा दर हा 100.06 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.63 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.64 रुपये इतका आहे.

दरम्यान घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ही वाढ व नवे दर माहिती करुन घेण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीची वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. येथे कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात नवे दर जाहीर केले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा https://iocl.com/Products/IndaneGas.aspx वर नवे दर तपासून पाहू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या किंमती कळू शकणार आहेत.