प्रातिनिधिक प्रतिमा

दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढत चालला आहे. यात इंधनदरवाढीपासून (Fuel Price Hike) झालेली सुरुवात ऑटो-टॅक्सी भाडेदरवाढीपर्यंत येऊन पोहोचली आहे. पेट्रोलचे दर आता शंभरीच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी वेगवेगळी शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. यात आता दुचाकीस्वारांनी आपल्या बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक इंजिन (Electric Engine) बसविण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे पेट्रोलचा वापर होणार नाही आणि महागाईपासून सुटका होईल. त्यामुळे आता मुंबईच्या रस्त्यांवर बॅटरीवर चालणारे बाईक्स पाहायला मिळत आहे. मुंबईकरांची ही आयडियाची कल्पना फारच भन्नाट आहे.

लोक त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन काढून त्याजागी बॅटरी बसवून घेत आहेत. म्हणजेच आता गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी बाईकमधील बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. याचाच अर्थ तुमची गाडी आता विजेवर चालू शकते. त्यावरील खर्च हा पेट्रोलच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे.हेदेखील वाचा- Summer Bike Riding Tips: उन्हाळ्यात बाईक चालवताना 'या' गोष्टी जरुर तुमच्यासोबत ठेवा

बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतरित करीत आहेत. यावर केवळ 10 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही ते सांगतात. असेही म्हटले जात आहे की बॅटरीनुसार शुल्कही बदलते.

इंजिन कसे Convert केले जाते?

असे सांगितले जात आहे की पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित (Convert) करताना, गीअर बॉक्स काढून टाकला जातो आणि त्यानंतर बाईक थेट अॅक्सिलरेटरद्वारे (Accelerator) नियंत्रित केली जाते. म्हणजेच जशी तुम्ही स्कूटी चावता अगदी तशीच बाईक चालवता येते. परंतु अशा प्रकारे स्कूटीचे इंजिन बदलले जाऊ शकत नाही, त्यासाठी बरेच बदल करावे लागतील. त्यामुळे त्यावर खूप खर्च करावा लागतो.