Summer Bike Riding Tips: उन्हाळ्यात बाईक चालवताना 'या' गोष्टी जरुर तुमच्यासोबत ठेवा
Bike Rider (Photo Credits: Twitter)

बाईक रायडर्सना बाइक चालवणे नव्हे तर तर दूरवरचा त्याच्या वरुन प्रवास करणे फार आवडते. त्याचसोबत कोणताही ऋतु असो बाईक रायडर्स नेहमीच तयार असतात. परंतु उन्हाळ्याच्या दिवस प्रत्येक जण बाईक राइडला जाण्यापूर्वी विचार करतात. कारण यावेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्यापासून बचाव करण्याचा अधिक प्रयत्न केला जातो. परंतु काही कारणास्वत नोकरदार वर्गातील लोकांना बाईकवरुन प्रवास करणे भाग पडते. याच पार्श्वभुमीवर येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या उन्हाळ्यात बाइकवरुन प्रवास करताना काही गोष्टी तुमच्यासोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या उन्हाळ्यात कुलिंग वेस्ट अधिक ट्रेन्ड मध्ये आहे. हे एक प्रकारचे जॅकेट असून ते तुम्ही घातलेल्या कपड्यांच्या आतमध्ये घालू शकता. हे जॅकेट कापड किंवा फॅब्रिक मध्ये सुद्धा उपलब्ध असते. फॅब्रिक मटेरियल मध्ये तुम्हाला बॅटरी मिळते. ज्यामध्ये एक डिवाइस दिले जाते. त्यामुळे तुमचे जॅकेट थंड राहते. त्याचसोबत जून-जुलै महिन्यात तापमानानुसार शरीर सामान्य ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.

उन्हाळ्यात काही जणांना सन स्ट्रोकचा त्रास होतो. अशातच तुम्ही नेहमीच तुमच्याजवळ पाण्याची बॉटल ठेवणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात बाईकवरुन प्रवास करत असाल तर तो प्रवास सातत्याने करण्यापेक्षा काही किमी वर थांबून केला तर फायदेशीर ठरेल. त्यावेळी तुम्ही पाण्याचे सेवन करुन पुढील प्रवासाला सुरुवात करु शकता.(BMW R NineT आणि R Nine Scrambler भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

त्याचसोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात बाईक चालवताना हेल्मेट जरुर असावे पण ते हलक्या वजनाचे असल्यास उत्तम ठरेल. त्यामुळे उन्हाळ्यात घाम येण्यापासून सुद्धा काहीशा प्रमाणात सुटका मिळण्यासह वारा सुद्धा खेळता राहिल. सफेद रंगाचे हेल्मेट असेल तर कमीत कमी गरम होईल.