मुंबई बाहेरील सर्वपक्षीय आमदारंना गोरेगाव येथे म्हाडाची 300 घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत गुरुवारी (24 मार्च) केली आणि राज्यभर टीकेची झोड सुरु झाली. सोशल मीडियावर ट्रोल करण्यापासून ते मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे आणि विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आणि महाविकासआघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी तातडीने प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. महाविकासाघाडीतील नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आमदारांच्या घरांबाबत विचारले असता ते म्हणाले की,'जर पैसे देऊन घरे दिली जात असतील तर मग त्यात चुकीचं काय आहे'. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले की, ''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. (हेही वाचा, BDD Chawl: बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नावे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी यांचा समावेश; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सभागृहात माहिती)
ट्विट
सर्वपक्षीय ३०० आमदारांना घरे देणार pic.twitter.com/Aqot0NXRlw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 24, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांबाबत विचारले असता ते म्हणाले, आमदारांना घरे देण्याबद्दल माझे मत वेगळे आहे. माझाही भाऊ आमदार आहे. पण, आमदारांना घरे देण्याची काहीच आवश्यकता नाही. मी याबाबत फार बोलणार नाही. पण, मला घर नको आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणजे राज्य सरकारला घरचा आहेरअसल्याचा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जातो आहे.