Manohar Joshi And Anagha Joshi (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी (Anagha Manohar Joshi) आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अचानक अनघा या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे कळते आहे. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोलले जाते. त्यांच्या अकाली निधनाने उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अनघा मनोहर जोशी यांचा जन्म 2 जानेवारी 1945 मध्ये झाले आहे. त्यांनतर 14 मे 1964 साली त्यांचा विवाह मनोहर जोशी यांच्याशी झाला होता. मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरु झाली. 1968 मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. मनोहर जोशी यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातल्या यशात अनघा जोशी यांची मोलाची साथ राहिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Health Minister Rajesh Tope's Mother Dies: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते सुनील सुर्वे यांचेही रविवारी निधन झाले आहे. उल्हासनगर एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली. कोरोनावर मात करून नुकतेच ते आपल्या घरी परतले होते. मात्र, 2 दिवसापूर्वी श्वास घेतना श्वास होऊन लागल्याने त्यांना मॅक्स लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच आज अखेरचा श्वास घेतला.