FDA Action On McDonald's: मॅकडोनॉल्डने 'चीज’च्या नावाखाली ग्राहकांची केली फसवणुक, अन्न आणि औषध प्रशासनाने दिला दणका

Ahmednagar: ‘चीज’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणुक होत असल्याचा हा प्रकार अहमदनगर (Ahmednagar) येथील ‘मॅकडोनॉल्ड’च्या (McDonald's) रेस्टॉरंटमध्ये समोर आला. येथील रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या ‘मॅकडोनॉल्ड’च्या विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. याबाबत अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्सने ‘मॅकडोनॉल्ड’ला या प्रकरणामध्ये कारणेदाखवा नोटीस बजावलेली. या नोटिशीनंतरही रेस्टॉरंटमध्ये काहीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे अहमदनगरमधील अन्न व सुरक्षा प्रशासनातील अधिकारी राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे यांनी ‘मॅकडोनॉल्ड’ला कारवाईचा इशारा दिला होता. (हे देखील वाचा: Maharashtra: मुंबईत 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत 10% पाणीकपात, जाणून घ्या अधिक माहिती)

अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने ‘मॅकडोनॉल्ड’मधील या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा देण्यात आला. पदार्थांची विक्री बंद होईल या भीतीने अखेर ‘मॅकडोनॉल्ड’ रेस्टॉरंटचे व्यवस्थापन पाहणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराॅं प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अखेर अन्न व सुरक्षा प्रशासनाला रिप्लाय दिला. कंपनीने पदार्थांची नावे बदलल्याचे आणि नावांमधून ‘चीज’ शब्द काढून टाकल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे. हा सारा प्रकार अहमदनगरसाठी मर्यादीत असला तरी ते राज्यातील सर्वच ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्टॉरंटना तो लागू होणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ‘मॅकडोनॉल्ड’च्या रेस्टॉरंटमध्ये खरं ‘चीज’ वापरलं जात नसलं तर पदार्थांच्या नावात चीज असा उल्लेख टाळावा या आदेशाची कोटेकोर अमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले. या रेस्टॉरंटमधून प्रत्यक्षात चीजच्या नावाखाली चीजसदृश्य पदार्थ दिला जात होता.