| (Photo Credits: PTI)

तुम्ही गाडी चालवता का? चालवता तर नेमकी कुठली? २ चाकी की ४ चाकी, अहो गाडी कुठलीही असु द्या पण गाडी चालवताना वाहतुकीचे सगळे नियम पाळण अत्यंत महत्वाचं असतं. यामुळे आपलचं नाही तर रस्त्यावर इतर वाहतुक दारांचंही आयुष्य सोयिस्यक होत. आता हे ऐकायला बरं वाटतं पम आपल्यातला प्रत्येक जण आठवड्यात एकदा तर वाहतुकीचा कुठला ना कुठला नियम नक्की मोडतो. हेल्मेट, रेड सिग्नल- ग्रिन सिग्नल- ऐलो सिग्नल यांत कुठेतरी आपण गोंधळ नक्कीचं घालतो. तरी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत म्हणुन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रिफीक पोलिसांनी तुमच्या कडून दंडही आकारला असेल. तेवढ्या वेळ वाटलं असेल की नियम पाळला असता तर बरं झालं असतं पण त्यापेक्षाही अधिक दु:ख असतं ते चालान कापल्याचं. पण आता मी तुम्हाला असं सांगितलं तर की ज्याप्रमाणे वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंड भरावा लागतो पण वाहतुकीचे नियम पाळल्यास तुम्हाला आकर्षक बक्षीस मिळेल  ऐकायला जरा विचित्र वाटत पण हो हे खरं आहे.

 

केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या नागपूरात याप्रकारचा एक विशिष्ट प्रकल्प सुरु करण्यात येणर आहे. ज्यानुसार तुम्ही वाहतुकीचे सगळे नियम अचूक पाळल्यास तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. रस्ते वाहतुक मंत्रालय व नागपूर महानगर पालिका यांच्या सहकार्यातून एका खाजगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिण्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रयोगाची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. मात्र यावर प्रत्यक्ष अमलबजावणी कश्या पध्दतीने केल्या जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Mumbai: बृहन्मुंबई क्षेत्रात 31 जानेवारीपर्यंत फटाके वाजविण्यास मनाई, जाणून घ्या कारण)

 

तरी वाहतुक नियमांचे पालन करुन बक्षीस मिळवण्यासाठी मोबाईलमध्ये एक विशिष्ट अप असणं अनिवार्य आहे. ट्राफिक रिवार्ड या अपचं नाव असुन या ॲपवर नोंदणी करण अनिवार्य असणार आहे. तरी फक्त अप असुन चालणार नाही पण या अप सोबतचं वाहनचालकांना त्यांचे वाहनावर लावण्यासाठी एक रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटीफीकेशन डीव्हाइस देखील मिळणार आहे. ज्यानुसार तुम्ही वाहतुक नियम पाळलेत की नाही हे ट्रॅक करणं शक्य होणार आहे. तरी नागपूरकर आता या नव्या प्रयोगास कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.