Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना (Marathwada Mukti Sangram Din) निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सिद्धार्थ उद्यानातील (Siddharth Garden) स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहण (Flag Hosting) कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शहीद झालेल्या सेनानींना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. दरम्यान आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अंबादास दानवे(Ambadas Danve), प्रशांत बंब (Prashant Bamb), हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी हजेरी लावली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील (Marathwada) लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले होते.  त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

 

दुष्काळ कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात (Maharashtra) वळवले पाहिजे, मराठवाडा वाटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं आहे. तसेच गेल्या सरकारच्या काळात जो काही बॅकलॉक (Backlog) आहे तो आम्ही नक्की भरून काढू असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत. (हे ही वाचा:- Maharashtra: शिंदे सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, यापुढे होमवर्क करावा लागणार नाही)

 

औरंगाबादमधील (Aurangabad) वेरूळ (Verul) मंदिरासाठी 136 कोटींची तरतूद  केल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सांगितलं आहे.  तसेच पैठणमध्ये (Paithan) संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी (Shirdi) महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आश्वासन दिलं आहे. शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) जायकवाडी (Jaikwadi) कालवा दुरुस्ती करणार, जालना (Jalna) पाणीपुरवठा नूतनीकरण आणि लातूरमध्ये (Latur) कृषी महाविद्यालय तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे.