Pune Police | (Photo Credits: ANI)

पुणे जिल्ह्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) समृद्ध जीवन समूहाच्या (Samruddha Jeevan group) अंतर्गत कंपन्यांच्या पाच गाड्या (Cars) जप्त (seizes) केल्या आहेत. समृद्ध जीवन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक महेश मोतेवार यांना सध्या 2015 च्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीत एकूण  4,725.64 कोटी रुपयांच्या दोन दशलक्ष छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक (DSP) मनीषा झेंडे आणि पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मित्सुबिशी पजेरो, बीएमडब्ल्यू आणि निसान मायक्रासह वाहने जप्त केली.

डीसीपी देशमुख म्हणाले, मोतेवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने अनेक चारचाकी गाड्या विकत घेतल्या. ज्या कंपनीचे अधिकारी वापरत होते. आम्ही नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणताही एजंट या कंपनीच्या गाड्या वापरत असेल तर आम्हाला कळवा. एकदा आम्हाला माहिती मिळाली की, वाहन ताबडतोब जप्त केले जाईल. हेही वाचा Pune Murder Case: पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञातांचा गोळीबार, दोन जण ठार

यापूर्वी 2018 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोतेवारच्या आठ राज्यांमध्ये पसरलेल्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ज्यात समृद्ध जीवन समूहाच्या विविध कंपन्यांच्या नावे फ्लॅट, कार्यालये आणि व्यावसायिक परिसर आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा समावेश होता.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महेश मोतेवार व त्याच्या साथिदारांनी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शेतकरी व गुंतवणुकदारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेतेवार विरोधात देशातील 22 राज्यात 28 गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, मागील 15 दिवसात पथकाने मोतेवारच्या अलिशान गाड्या जप्त करण्यावर भर दिला होता. त्यानुसार मोतेवारच्या पुण्यातील धनकवडी येथील बंगल्यातुन 3 गाड्या जप्त केल्या.त्यानंतर एजंटकडे असणाऱ्या दोन गाड्या जप्त केल्या. यामध्ये मायक्रा, स्विफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे.